ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या

शहर : देश

तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान,  मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. 
बंगालमधील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मात्र मतदानापूर्वी येथे हिंसाचाराने डोके वर काढले आहे. बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.

दुसरीकडे मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या मृतदेह सापडला आहे. सुधाकर मैती असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याशिवाय मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार कऱण्यात आला आहे. तसेच बेल्दा येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. 

 दरम्यान, बंगालमधील माजी आयपीएस अधिकारी आणि घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. केशपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी गैरवर्तन केले, असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

मागे

जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी
जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी

जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आ....

अधिक वाचा

पुढे  

पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत- आठवले
पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत- आठवले

 'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मरणार नाहीत' अशा शब्दात कें....

Read more