By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाचा आढावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल चढवला. कोणतेही काम असेल तर ते करत नाहीत. केवळ अटी टाकून ते काम कसे रखडले जाईल, असेच धोरण अवलंबते. हे सरकार अटींचे सरकार आहे. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट,प्रवेशाला अट, प्रवेशाला अट यातून कोणाचंही भलं होणार नाही, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.
फक्त व्हिडीओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्याच ऐकत नाहीत. आचारसंहितेचा बावू करतायेत. अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी प्रदेश दौऱ्यावर गेलेत, अशी सडकून टीका अजित पवार यांनी केली.
ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते. पण काहींच्या मनात शंका आहे. मोदीच ढगाचे, ईमेल, डिजिटल कॅमेरा विधान हास्यपद असल्याची टीका केली. ग्रामीण भागातील लोकांना पण न पटणारे, विधान करुन त्यांनी टीका केली.
कमल हसनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'मक्कल निधी मैयम'च्या ए....
अधिक वाचा