By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावरून आता अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमने-सामने आले आहेत. ही भाजप-राष्ट्रवादी युती असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांचं हे वक्तव्य चुकीचं आणि लोकांची दिशाभूल करणारं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी फटकारलं आहे.
एकीकडे पवार कुटुंबात हा वाद सुरू असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि युवा नेते उमेश पाटील यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मला उभं आडवं चिरलं तरीही माझ्या शरीरात फक्त शरद पवार आहेत. मी राष्ट्रवादीतच असून पवार कुटुंब एकत्र आहे. कार्यकर्त्यांनी संभ्रमात पडू नये,' अशा भावना अजित पवार यांनी बोलून दाखवल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांनी फटकारलं!
भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,' असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवारांना फटकारलं आहे. भाजपसोबत सरकार बनवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याचं निश्चित केलं आहे. अजित पवार यांचं स्टेटमेंट चुकीचं आणि दिशाभूल करणारं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलेलं आहे,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
'काळजी करण्याचं कारण नाही. सगळं काही ठिक आहे. फक्त थोड्या संयमाची गरज आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मी राष्ट्रवादीत असून यापुढेही कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,' असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात काल (23 नोव्हेंबर) पहाटे मोठा राजकीय भूंकप (Jitendra aawhad talk on ajit pawar) झाला. त....
अधिक वाचा