ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुप्रिया सुळेंसोबतच्या आरोपामुळे अजित पवारांचा राजीनामा?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 10:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सुप्रिया सुळेंसोबतच्या आरोपामुळे  अजित पवारांचा राजीनामा?

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर आता अजित पवारांच्या राजीनाम्याला त्यांचा आणि सुप्रिया सुळेंचा वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे. ईडी कारवाईत शरद पवारांचं नाव आल्यामुळे शरद पवारांच्या अपरोक्ष हा वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवारांमुळे शरद पवार अडचणीत येत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सुप्रिया सुळेंच्या आरोपानं अजित पवारांना राग अनावर झाला आणि त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं कळतंय. बारामतीच्या उमेदवारीवरुनही दोघांमध्ये धुसपूस होती. पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध होता त्यात इडी प्रकरणात शरद पवारांचं नाव आल्यानं सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना त्यांचा मुलगा पार्थ पवारला उमेदवारी द्यायची आहे, पण याला शरद पवारांचा विरोध आहे, त्यामुळे अजित पवार आधीपासूनच नाराज होते, असं कळतंय. त्यातच हा वाद होऊन अजित पवारांचा भडका उडाला आणि त्यांनी राजीनामा दिला, अशी माहिती पुढे येत आहे.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार कोणाच्याही संपर्कात नाहीत. एवढच नाही तर अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा का दिला हे राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांना माहिती नाही. अजित पवारांनी राजीनामा देताना आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही, असं शरद पवार यांनीही स्पष्ट केलं.

त्यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. मात्र, मी कुटुंब प्रमुख असल्याने मला याबाबतची माहिती जाणून घेण्याची माझी जबाबदारी होती. मीही माहीती घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबातही चर्चा केली. तसेच माझे  नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

 

 

मागे

पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत
पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत

ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे, अश....

अधिक वाचा

पुढे  

पितृपक्ष संपल्यानंतर उद्या युतीची घोषणा होणार ?
पितृपक्ष संपल्यानंतर उद्या युतीची घोषणा होणार ?

भाजपा-शिवसेना यांच्यात युती होणार की नाही ? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळ....

Read more