ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार

शहर : मुंबई

विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजित पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोहोर उमटवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची नुकतीच एक बैठक पार पडली. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्व आमदारांनी अजित दादांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी याला अनुमोदन दिले.

वातावरण काहीही असलं तरी ते बदलण्याची क्षमता किती असते हे दाखवून पवारांनी दाखवून दिले. सगळ्या आमदारांसाठी शरद पवार यांनी अथक मेहनत केली. आमच्याकडे शरद पवार नावाचा नेता आहे त्यामुळे महाराष्ट्रात काहीही घडू शकतं हे मी सगळ्यांना सांगायचो असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

सभा असो की परिषद अत्यंत प्रभावी काम विरोधी पक्षाने केलं.लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात सर्वजण अस समजायला लागले 226 मतदारसंघात युती पुढे आहे त्यामुळे असाच निकाल येईल. सर्व पक्षाने एकत्र येऊन काम केलं, हल्लाबोल, जनसंघर्ष यात्रा,परिवर्तन यात्रा, शिवस्वराज्य यात्रा काढली, जनतेने आपल्या विचारांचे स्वागत केल्याचे ते म्हणाले.

मागे

या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम
या तारखेला शपथविधी.. पण सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम

मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना येत....

अधिक वाचा

पुढे  

'शक्य ते सगळं करणार' - उद्धव ठाकरे
'शक्य ते सगळं करणार' - उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेमध्य....

Read more