ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 06:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं

शहर : मुंबई

अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं. आणि प्रथमच या सत्तासंघर्षातील अजित पवारांची एक बाजू समोर आली. शिवसेनेबरोबर मुख्यमंत्रिपदावरून तिढा वाढल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सत्तेच अर्धा वाटा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे भाजपनं सत्तास्थापनेचं राज्यपालांचं निमंत्रण नाकारलं आणि वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली. भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याशीही चर्चा झाली होती. याशिवाय, शरद पवार यांच्या मर्जीनं भाजपच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची सूत्रं आपल्या हाती आली होती, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरु झाली. ही चर्चा फिस्कटेल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत होतं. मात्र काँग्रेसचे नेते तहात पुढे जाताना शिवसेनेशी जुळवून घ्यायला लागले. तसेच काँग्रेसच्या मागण्या शिवसेनेकडून मान्य केल्या जाऊ लागल्या.

शिवसेना-काँग्रेसबरोबरची बोलणी यशस्वी होऊ लागल्याची चिन्हं दिसताच अजित पवारांनी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.एकूणच, शिवसेना-काँग्रेसबरोबरची बोलणी पुढे गेली आणि भाजपबरोबर जाण्याचा प्लान अपेक्षेनुसार यशस्वी होणार नाही असे वाटल्यानंच अजित पवारांनी फडणवीसांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी रात्रभर पुढच्या घडामोडी घडल्या.

मागे

महाआघाडीचं शक्ती प्रदर्शन, १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन
महाआघाडीचं शक्ती प्रदर्शन, १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे सर्व आमदार एकत्र येऊन करणार ....

अधिक वाचा

पुढे  

सिंचन घोटाळ्यातील 9 प्रकरणाची चौकशी बंद, अजित पवारांना दिलासा
सिंचन घोटाळ्यातील 9 प्रकरणाची चौकशी बंद, अजित पवारांना दिलासा

बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलास....

Read more