ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण

शहर : मुंबई

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या दि. २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. या निकालाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

मतमोजणी उद्या सकाळी वाजता होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. २६९ ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.

सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने आन करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे.

स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत, असे ते म्हणालेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि राज्य पोलीस यांचा खडा पाहारा ठेवण्यात आला आहे.

मागे

शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत
शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत

राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाह....

अधिक वाचा

पुढे  

स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला - शिवसेना
स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला - शिवसेना

विधानसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक प्रश्नांऐवजी पाकिस्तान आणि कलम ३७० पु....

Read more