By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या ४४ जागा येतील असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात येणार, चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले आहे. त्यामुळे २३ तारखेच्या निकालकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा युती पटकवणार आहे. त्यात पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश असेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पत्रकार परिषद घेऊन एकाही प्रश्नाला उत्तर न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोद....
अधिक वाचा