ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानपरिषद निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानपरिषद निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

शहर : औरंगाबाद

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परीषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांचा 418 मतांनी पराभव करून बाजी मारली. दानवे यांना 524 तर कुलकर्णींना 106 मते पडली.

यानिवडणुकीत पहिल्यापासून उत्सुकता खूप वाढली होती, पण चुरस मात्र दिसली नाही. कारण या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरपरिषदेचे पदाधिकारी हे मतदार असतात. सध्या औरंगाबाद- जालन्यात शिवसेना भाजपाच्या मतदारांची संख्या जास्त आहे. एकूण 657 मतदारांपैकी महायुतीकडे 330, महाआघाडीकडे 250 तर एमआयएम, अपक्ष मिळून 77 मतदार होते. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार, हे निश्चित होते. तरी देखील धोका नको म्हणून शिवसेना भाजपने आपले सर्व मतदार इगतपुरी येथील एका बड्या हॉटेल मध्ये तब्बल 5 दिवस मुक्कामाला ठेवले होते. तर कोंग्रेसनेही आपल्या मतदारांची एका बड्या रिसॉर्ट वर बडदास्त ठेवली होती. 19 ऑगस्टला सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात दानवे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले.

मागे

ईडी केस : मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस
ईडी केस : मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

उद्या गुरुवारी दिनक 22 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नोटीसीप्रमाणे ईडीच....

अधिक वाचा

पुढे  

राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांसह 50 जणासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश
राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांसह 50 जणासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50....

Read more