By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिलेले 370कलम हटवल्यानंतर या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. तथापि काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इच्छेला धूप घातली नाही. चर्चेतून काश्मीरप्रश्नी व्दिपक्षीय चर्चा होईल. असे अमेरिकेला भारताने स्पष्टपणे बजावले. त्यानंतर भारताने जम्मू-काश्मीर बाबतीत धाडसी निर्णय घेताच अमेरिकेने सावध भूमिका घेत इशाराही दिला आहे.
अमेरिकेच्या प्रवक्त्या मॉर्गन ओर्टेगास यांनी या संदर्भात म्हटले आहे की, "आम्ही भारत आणि पाकिस्तानकडे एलआयसीवर शांती व स्थिरता टिकवून ठेवण्याचे आव्हान करीत आहोत. जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर आम्ही लक्ष्य ठेवून आहोत. जम्मू-काश्मीरला मिळणाऱ्या संवैधानिक अधिकार संपवण्याच्या भारताच्या घोषणेची आम्ही दखल घेतलेली आहे"
भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री कोण व्हा....
अधिक वाचा