ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाक दहशतवादी भारताला टार्गेट करतील अमेरिकेचा ‘नवा शोध’

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 07:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाक दहशतवादी भारताला टार्गेट करतील अमेरिकेचा ‘नवा शोध’

शहर : विदेश

जम्मू काश्मीरला  विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविल्यापासून पाकिस्तान चा थयथयाट  थयथयाट सुरू आही. पाकला या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाचेच सहकार्य लाभले नाही. मात्र या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी घुसवून हिंसक कारवाया करण्याचे मनसुबेही भारतीय सेनेने वेळोवेळी हाणून पाडले आहेत. भारतात दहशतवादी घुसविण्याचा पाकचा प्रयत्न किंवा भारतात दहशतवादी घुसल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटनाही वेळोवेळी देत असतात. भारत याबाबतीत सदैव जागरूक असल्याचे गेला काही वर्षात सिद्ध ही झाले आहे. मात्र असे असताना अमेरिकेने याबाबतीत एक इशारा देताना म्हटले आहे की, “कलम 370 हटविल्यामुळे पाकिस्तानातील अतिरेकी गट भारतात दहशतवादी हल्ला करू शकतात”.

अर्थात अमेरिकेने यात नवे काय सांगितले ? असा प्रश्न पडावा. मात्र यावर थोडा विचार केला तर याचे कारण लक्षात येईल. काश्मीर प्रश्न हस्तक्षेप करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा लपून राहिलेली नाही. याआधी त्यांनी किमान 4 – 5 वेळा तरी तसे वक्तव्य ही केले होते. मात्र प्रत्येक वेळी भारताने काश्मीर चा प्रश्न व्दिपक्षीय असून त्यात कोणाचीही गरज नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या  अधिवेशनासाठी भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत यशस्वी दौरा करून आले . मात्र त्यानंतर भारताने कोणत्या देशाकडून काय खरेदी करावे किंवा नाही याचा अधिकार केवळ भारताचाच आहे. , असेही भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

भारत रशियाकडून क्षेपणास्त्र प्रणाली  खरेदी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या खरेदी मुळे अमेरिका भारतावर निर्बंध लडण्याची भीती होती. त्यामुळे सोमवारी जयशंकर यांनी अमेकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांची भेट घेतली. शिवाय अमेरिकी माध्यमांव्दारे विचारण्यात  आलेल्या संदर्भातील प्रश्नांना जयशंकर यांनी परखडपणे उत्तरे देवून भारताची भुमिका स्पष्ट केली.

अशा प्रकारे अमेरिकेच अनेक मनसुबे भारताने उधळून लावल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पाक दहशतवादयासंदर्भात भारतालाही माहीत आलेला इशारा अमेरिका देवून काय सूचित करू इच्छिते, याचा विचार होणे गरजेचे आहे. पाक दहशतवादी इशारा देताना इंडो पॅसिफिक सुरक्षा विषयाचे सहाय्यक सचिव शायावरयांनी म्हटले आहे की, “काश्मीर च्या निर्णयावरून पाकिस्तानातील दहशत वादी संघटना भारतात स्सिमापार हल्ले करू शकतात. अनेक देशांना याबद्दल छिन्नता आहे. पाकिस्तानने या दहशतवादी संघटनांना आवरले पही चीनला भारत पाकिस्तान मध्ये असा संघर्ष हवा आहे."

मागे

अखेर रुसवा नाट्य संपले
अखेर रुसवा नाट्य संपले

पुत्र संदीप नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून वडील गणेश नाईक यांना द....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेनेकडून वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून जोरदार शक्तीप....

Read more