By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2019 11:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेना-भाजपामध्ये बंडखोरांचे प्रमाण वाढले.त्यात बंडखोरांना शांत करण्यास काही प्रमाणातच यश आले आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा मतदार संघ निवडला आहे. राज्यभरात बंडखोरांचे आव्हान तर आहेच त्यासोबतच सध्या आरे प्रकरण देखील युतीच्या यशात अडथळा आणणार असं दिसतंय. या सर्व पार्श्वभुमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतोय.
या मेळाव्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे. दसरा मेळाव्यातूनच शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात य़ुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. बीडमध्ये दसरा मेळाव्याला अमित शाह प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तर मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत.
ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधल....
अधिक वाचा