ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज'पूत्र' अमित राजकरणात सक्रिय होणार ?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज'पूत्र' अमित राजकरणात सक्रिय होणार ?

शहर : मुंबई

         मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज'पूत्र' अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारीला मुंबईत मनसेचं पहिलं महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अमित ठाकरे यापुढे राजकारणातील सक्रिय होणार असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


          राज ठाकरे आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरुन भविष्यात मनसे आणि भाजप असं समीकरण राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता अमित ठाकरे यांचं राजकरणात पदार्पण होणे म्हणजे मनसे पक्षाला नवचैतन्य आणि युवा नेतृत्त्व देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.


         अमित ठाकरे यांनी याआधी मनसेच्या काही आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचं नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केलं होतं. तर रेल्वे आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती.


         दरम्यान, राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, व्यासपीठावरुन त्यांनी सक्रियपणे भाषण केलेलं नाही. आता २३ जानेवारीच्या पक्षाच्या अधिवेशनात अमित ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागे

ठरलं! दिल्ली विधानसभा निवडणुकांचे ८ फेब्रुवारीला होणार मतदान
ठरलं! दिल्ली विधानसभा निवडणुकांचे ८ फेब्रुवारीला होणार मतदान

        नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा ....

अधिक वाचा

पुढे  

धुळे वगळता पाच जिल्हापरिषदांमध्ये भाजपचा पराभव
धुळे वगळता पाच जिल्हापरिषदांमध्ये भाजपचा पराभव

      नागपूर - महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भा....

Read more