ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या

शहर : मुंबई

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासारखा दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे.

खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे मुली किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

देशात अशाप्रकारे अत्याचाराचे कृत्य करणाऱ्या नराधमांना पुढील आठ ते दहा वर्षे जगू शकतात, आमच्यावर कडक कारवाई होत नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जो किडा आहे तो असाच राहणार आहे. जोपर्यंत आपल्या देशातील कायद्यात बदल होत नाहीत तोपर्यंत हे सतत घडत राहणार आहे,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

देशातील केंद्र सरकारने अन्यथा प्रत्येक राज्यात, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांनी दिशा कायद्याची तरतूद केली आहे. जे कोणी असे कृत्य करेल, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हा कायदा सांगतो. त्यानुसार प्रत्येक राज्याने हा कायदा अमलात आणायला हवा,” असे नवनीत राणा यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी वर्ध्यातही अशाचप्रकारची घटना घडली होती. तेव्हाही आम्ही गृहमंत्र्यांनी विनंती केली होती, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेशातील सरकारने दिशा कायद्यामार्फत तरतूद आणली आहे. तसेच आपल्या राज्यातही बदल केला पाहिजे. देशानेही सर्व राज्यात हे लागू करायला हवं. त्यामुळे आपल्या देशात अशाप्रकारे कृत्य करणारे नराधम यापासून दूर राहतील आणि या घटना कमी होतील,” असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं.

मागे

मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी
मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी

समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी आज (30 सप्टेंबर) मंत्रालय....

अधिक वाचा

पुढे  

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात,त्यांनी स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं:अनिल देशमुख
योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात,त्यांनी स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं:अनिल देशमुख

“योगी आदित्यनाथ बाकी राज्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्....

Read more