ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडली, नागपूरला हलविले

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडली, नागपूरला हलविले

शहर : नागपूर

अमरावती  येथील खासदार नवनीत राणा-कौर  यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह  आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते.

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती अधिक बिघडल्याने अधिक उपचारासाठी नागरपूरला हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहेजवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. सुरुवातीला रवी राणा यांच्या वडिलांनंतर आई, बहीण, भावोजी, भाचा, पुतण्या अशा एकूण सात सदस्यांना लागण झाल्याचे चाचणी अहवालात समोर आले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही संसर्ग झाल्याचे समजले. आमदार रवी राणाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेततर त्यांचे पती आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.

मागे

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक
राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही ....

अधिक वाचा

पुढे  

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर
Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध....

Read more