ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांचा जंगलातील जमिनीवर बंगला; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 07:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांचा जंगलातील जमिनीवर बंगला; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शहर : मुंबई

आरेतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलिबागमध्ये वन जमिनीच्या हद्दीत बंगला बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई (अलिबाग) येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते.

किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली आहे. सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

उद्धव ठाकरेंनी अलिबागमधील संपत्ती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथील पाच कोटींची संपत्ती लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. ही माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही.

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी मध्यंतरी उपस्थित केले होते.

मागे

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्....

अधिक वाचा

पुढे  

शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर…
शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर…

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरे....

Read more