By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून प्रतिश्रेत असणार्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि प्रकरणी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. सध्याच्या घडीला गरजू रूग्णांच्या मदतीसाठी वैद्यकीय निधीचं काम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केले जाणार आहे.
सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने मंत्रालयातील कामकाज ठप्प आहे. त्यातच गरजूंना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येते. पण सत्ता स्थापन न झाल्याने हा मदत कक्ष बंद आहे. त्यामुळे गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. या काहींवर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेवर मदत न मिळाल्याने गरजू व त्यांचे नातेवाईक अस्वस्थ आहेत. या संदर्भात प्रसार माध्यमातूनही आवाज उठविण्यात आला. ही मदत देण्याची प्रक्रिया सुरू राहावी, अशी मागणीही करण्यात येत होती. राज्यपालांकडे हा विषय मांडण्यात आला. हा कक्ष सुरू करण्यासाठी आता तीन अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली. त्या धर्तीवर आत प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण, जुने अर्ज मार्गी लावणं ही कामं पुढे होऊन गरजूंना मोठी मदत मिळण्याची चिन्हे आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयात मदतीसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही तात्पुरती सोय करण्यात आली असून मदतीचे धनादेश हे मंत्रालयात स्वीकारण्यात येणार आहेत.
दिल्लीतील काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त बैठक सकारात्मक झालेली असली तरी ....
अधिक वाचा