By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील खातेवाटपाबाबत अद्याप चर्चाच सुरू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत खातेवाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या तीन महत्ताच्या खात्यांवरन मतभेद निर्माण झालेले आहे.
त्यातच या सरकारमध्ये महत्त्वाची खाती मिळत नसल्याचे दिसत असल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. खातेवाटपात समाधानकारक खाती न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते.
त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य सहा मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. मात्र या शपथविधीला पंधरवडा उलटत आला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच महत्त्वाच्या खात्यांबाबत एकमत होत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. दरम्यान, सरकारमधील तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठ....
अधिक वाचा