ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...आणि राज्यपालांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...आणि राज्यपालांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली

शहर : मुंबई

        मुंबई - मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध आमदारांनी शपथ घेतली. काँग्रेस आमदार के.सी. पाडवी यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांनी शपथविधीचा शिरस्ता मोडून शपथविधीचा मजकूर सोडून त्यांनी लिहून आणलेला मजकूरही वाचून दाखवला. ज्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाडवी यांच्यावर चांगलेच चिडले आणि त्यांना शपथ पुन्हा घ्यायला लावली.

         स्वतःच्या मनातला मजकूर वाचायचा नाही, शपथ कशी घ्यायची असते? हे एकदा समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही त्यांनी सुनावलं.


        “येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होतो, माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या मतदारांचा ऋणी आहे ” ही काही वाक्यं पाडवी यांनी लिहून आणली होती. ती शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी वाचून दाखवली. 


          ज्यावर राज्यपाल कोश्यारी चांगलेच चिडले. शपथ घ्यायची ही पद्धत नसते. जेवढं लिहून दिलं आहे तेवढंच वाचा. तुम्हाला शपथ कशी घ्यायची ते ठाऊक नसेल तर समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही राज्यपालांनी पाडवी यांना सुनावलं.
 

 

मागे

संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत
संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत

       मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून राज्यात घडलेल्या रा....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

          मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथवि....

Read more