By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : adilabad
आंध्रप्रदेशमध्ये ११ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. आंध्रप्रदेशच्या 175 विधानसभा जागांसाठी आज सुरु असलेल्या मतमोजणीत मोठी आश्चर्यकारक आकडेवारी समोर येत आहे. 2004 मध्ये बाजी मारलेल्या चंद्राबाबू नायडू यांना यंदाच्या निवडणूकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी 152 जागांवर आघाडी घेतली असून सरकार स्थापनेच्या अगदी जवळ पोहचल्याचे समोर आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेसचे 152 जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेलुगू देसम पार्टी 27 जागांवर पुढे आहे. अभिनेता पवन कल्याण यांचा पक्ष जन सेना केवळ एका विधानसभा जागेवर पुढे आहे. सुरुवातीच्या आलेल्या कलनंतर, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. दुपारपर्यंत चंद्राबाबू नायडू अधिकृतपणे राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या मतदान मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जगनमोहन रेड्डी आघाडीवर आहेत. वायएसआर विधानसभा जागांवर आघाडीवर असून सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर आहे. या निवडणूकीमध्ये तेलुगू देसम पार्टीच्या मतांमध्ये जवळपास 6 टक्क्यांची कमी झाली असून वायएसआर काँग्रेसच्या मतांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फायदा पक्षाला झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ह....
अधिक वाचा