By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 08:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, कोणीही आमच्या दैवताबद्दल काहीही बोललं तर आम्ही ऐकून घेणार नाही, असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचं नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही. नौसेना अधिकारी आहे म्हणून संयम तोडण्याचा अधिकार कुणी दिला? शिवसैनिकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ही”, असं म्हणत अनिल परब यांनी नौदल प्रमुखांवरील हल्ल्यावर त्यांचं मत स्पष्ट केलं
“बेकादेशीर कामं करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असतील तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ”, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांना विचारला. कंगना रनौतने तिच्या कार्यालयाच्या बांधकाम पाडण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावरुन अनिल परब यांनी कंगना आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं.
“कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल, तर तिने योग्य वाटत असेल तिथं राहावं. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपलं बस्तान त्यांनी उचलावं हेच योग्य ठरेल”, असं म्हणत अनिल परब यांनी कंगनाला महाराष्ट्राबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
“त्यांना जर मुंबई POK वाटत असेल, तर शिवसेनेने भूमिका घेतली आहे. त्यांना जिथे योग्य वाटत तिथे राहावं. पण, मुंबईबाबत कोणी वाईट बोलत असेल, तर ते ऐकून घेऊ शकत नाही. हा अपमान मुंबईवर प्रेम करणाऱ्यांवर आहे. मुंबई POK असेल तर त्यांनी आपलं बस्तान इथून हलवावं. महापालिकेने बेकायदेशीर कामावर कारवाई केली, त्यांना राज्यपाल वेळ देत असतील, तर असेच इतरांनाही राज्यपाल भेटले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे”, अशी टीका अनिल परब यांनी केली.
कंगनाला चांगल्या डॉक्टरची गरज – अनिल परब
“कंगना रनौत स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असं म्हणतात. तिला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, डॉक्टर नाही भेटले तर शिवसेना मदत करेल. शिवसेना कंगनाला काही बंदी घालणार नाही ती महत्वाची नाही. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या”, असा खोचक टोलाही अनिल परब यांनी लगावला.
केंद्राचे लक्ष प्रत्येक राज्यात सत्ता आणण्याचे – अनिल परब
“चीन हेरगिरीबाबत केंद्राने विचार करावा, परंतु त्यांचे लक्ष प्रत्येक राज्यात सत्ता आणण्याचे आहे”, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
“ठाकरे ब्रॅण्डला पर्याय नाही, राज्यात त्याला विरोधकांनाकडून धक्का लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण हा ब्रॅण्ड भक्कम आहे. त्यांचे नाव ठाकरे असल्यानं साद घातली. शिवसेनेची पाळेमुळं उखडता येणार नाहीत, कुणाला आमदार असूनही सीएम होता आलं नाही. याचे नैराश्य आहे त्यांचे. त्यामुळे राज्याची बदनामी केली जातं आहे”, असंही ते म्हणाले.
“ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकत नाही अनेकांनी प्रयत्न केले गेले आहेत. त्यांनी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही एकटे लढत आहोत. सेनेनं वाईट काळ बघितला आहे. प्रत्येकाला स्वतःचा विचार आहे. नातेसंबंध आणि राजकीय असतो. आपला निर्णय घ्यायला प्रत्येक जण स्वतंत्र आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रामदास आठवले हे अर्धै शटर बंद झालेले दुकान – अनिल परब
“रामदास आठवले हे अर्धै शटर बंद झालेले दुकान आहे, त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं? कंगना अभिनेत्री आहे, तिला जे स्क्रिप्ट दिलं जातंय, त्यानुसार ती बोलते”, असंही त्यांनी म्हटलं.
“किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयातही मला चहा प्यायला जायचं आहे. त्यांच्या कार्यालयाबाबत मला बरंच काही समजले आहे. मला भेट देवून पाहणी करायची आहे”, असं म्हणत अनिल परब यांनी सोमैय्यांवर टीका केली.
सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अनपेक्षित – अनिल परब
“आंदोलन कधी केलं जातं, जेव्हा सरकार साथ देत नाही. हा विषय सर्वपक्षीय राजकारणाचा आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अनपेक्षित आहे. कोर्टाने दिलेल्या स्थगितीबाबत काय करायचं याबाबत बैठक सुरु आहेत. सर्व संघटनांची मतं जाणून घेतली. देवेंद्र फडणवीस बिहारवरुन आले की त्यांच्याबरोबर चर्चा होईल. आरक्षण टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे”, असंही ते म्हणाले.
“विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत सरकार निर्णय घेईल. राज्यपालांनी जाहीर विधान करावे. आम्ही नाव पाठवल्यावर ते कारवाई करतील आम्ही यादी पाठवतो”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
जगात कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, म....
अधिक वाचा