ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे- अनुराग कश्यप

शहर : मुंबई

सोशल मीडियावरील कॉन्ट्रोव्हर्सी किंग अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलय. पुन्हा पंतप्रधान मोदींना उद्देशून एक ट्विट करत नवा वाद निर्माण केलाय. अनुरागने ट्विटरवर एक पोस्ट करत पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे, असं म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टनंतर सध्या सोशल मीडियावर नवीन चर्चा रंगली आहे. अनुराग कश्यपने यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अनुरागने लोकसभा निवडणुकांचं निमित्त साधत पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी योग्य असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. खरं तर साऱ्याच पक्षांमध्ये भ्रष्टाचार हा होत असतो. मात्र आता या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचार म्हणजे काहींसाठी आदर्शचं झाला आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट होऊ शकतं, असं अनुराग म्हणाला. मोदींना पाठिंबा देणारा एक मेसेज अनुरागला व्हॉट्स अॅपवर आला होता. त्यामुळे हा मेसेज पाहिल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

मागे

विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...
विनोद तावडेंन उडवली राज ठाकरेंची खिल्ली...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत ....

अधिक वाचा

पुढे  

किरीट सोमय्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल निवडणूक आयोगाकडे तक्रार
किरीट सोमय्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल निवडणूक आयोगाकडे तक्रार

जसजशा निवडणुकां तोंडावर येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघा....

Read more