By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऐन निवडणूकच्या धावपळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेची सुनावणी करण्याची कोर्टाने परवानगी दिली आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा दिला आहे. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. याचिकेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे
अॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली आहे.देवेन्द्र फडणवीस यांच्यावर 1996 व 1998 मध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, पण त्यात आरोपपत्र दाखल झाले नव्हते. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे निवडणणुक लढविणार की नाही? कोणत्या मतदारसंघातून लढविणार ? हे ....
अधिक वाचा