By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 28, 2019 08:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला प्रश्न विचारत तपासाच्या गतीवर सवाल उपस्थित केला आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींचा शोध न लागल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाच्या गतीवर सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाने तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारत राज्य सरकारला फटकारले आहे. मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणासाठी वेळ नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याचेही मुंबई हायकोर्टाने म्हटले.
मुंबई : उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपुर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश के....
अधिक वाचा