ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'पापड खा अन् कोरोनाला लढा द्या' म्हणणारे केंद्रीय मंत्री मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2020 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'पापड खा अन् कोरोनाला लढा द्या' म्हणणारे केंद्रीय मंत्री मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह

शहर : देश

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर औषध किंवा लस येण्यावर रोज वेगवेगळे दावे आपण ऐकत असतो. अशात अमुक खाल्ल्याने कोरोना बरा होतो, म्हणणारे दावेही आपण ऐकले. यात एक दावा केला होतो केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी केला होता, नंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच मंत्री मेघवाल यांना आता कोरोनाची लागण झाली आहेशनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गृह मंत्री अमित शाह यांच्यानंतर केंद्र सरकारचे 2 मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहेमेघवाल आणि चौधरी या दोघांनीही ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मेघवाल यांनी काय केला होता दावा

संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते एका खासगी कंपनीचा पापड लाँच करण्यात आला होता. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होतापापड लाँच कार्यक्रमात मेघवाल म्हणाले होते की, कोरोनाचा सामना करण्यासाठी या पापडाने आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील, हे आत्मनिर्भर भारतअंतर्गतभाभीजी पापडनावाने एका खासगी उद्योजकाने पापड तयार केले आहेत. या पापडामुळे कोरोना व्हायरस सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील. कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. माझ्या त्यांनी शुभेच्छा आणि ते यशस्वी होती अशी मला आशा आहे, असं ते म्हणाले होते. या व्हिडीओमुळे मेघवाल चांगलेच चर्चेत आले होते.

मागे

मोदी सरकारचे 20 लाख कोटी गेले कुठे? युवक काँग्रेस करणार पर्दाफाश आंदोलन
मोदी सरकारचे 20 लाख कोटी गेले कुठे? युवक काँग्रेस करणार पर्दाफाश आंदोलन

कुठे गेले ते वीस लाख कोटी रुपये? हा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र युवक काँग्रे....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक
राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही ....

Read more