ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लष्कर सज्ज; भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये नागरीकत्व विधेयकावरुन अस्वस्थतता

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लष्कर सज्ज; भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये नागरीकत्व विधेयकावरुन अस्वस्थतता

शहर : देश

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसामच्या गुवहाटी आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडले आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

त्रिपुराच्या कांचनपूर आणि मनू भागात भारतीय लष्कराने दोन तुकडया पाठवल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ७० सैनिक आहेत. आसामध्ये सुद्ध लष्कराला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांचे तात्काळ कृती दल आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात पाठवले असून संपूर्ण ईशान्य भारतामध्ये निमलष्करी दलाचे ५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

या विधेयकावरुन भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. या विधेयक मंजूर झाल्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातून आलेल्या हिंदुंचा भारतीय नागरीकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आसाम, त्रिपुरातील आंदोलनामध्ये विद्यार्थी, नागरीक आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व भाजपावर संतप्त आहेत. बाहेरुन आलेल्यांना नागरीकत्व दिले तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी त्यांच्या मनात भिती आहे.
 

मागे

...आणि महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसने दिला बाहेर पडण्याचा इशारा
...आणि महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसने दिला बाहेर पडण्याचा इशारा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री ठाकरे कार्ल्यात एकवीरा देवीच्या दर्शनाला रवाना, आज मोठा निर्णय घेणार?
मुख्यमंत्री ठाकरे कार्ल्यात एकवीरा देवीच्या दर्शनाला रवाना, आज मोठा निर्णय घेणार?

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या द....

Read more