ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राजेश टोपेंकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची कबुली, शरद पवारांकडून तात्काळ व्यवस्था

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राजेश टोपेंकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची कबुली, शरद पवारांकडून तात्काळ व्यवस्था

शहर : मुंबई

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून सुरु होते . राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबतची कबुली दिली होती.या माहितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. शरद पवार यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली.दरम्यान कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा याचे पुन्हा एक नवे उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे.

राजेश टोपे काय म्हणाले होते ?

रेमिडीसीवर हे अँटीव्हायरल इंजेक्शन आहे. या इंजेक्शन निर्मात्या ज्या काही कंपन्या आहेत. त्यातील काही बॅचेसमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या ड्रग कंट्रोल अथोरीटीने त्या बॅचेस रद्द केल्या. त्यामुळे खऱ्या अर्थान आज तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा निश्चितप्रकारे सुरळीत होईल. राज्य सरकार, सार्वजनिक आरोग्य विभागाने याचे मोठ्या पद्धतीने ऑर्डर दिल्या आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितले होते.

निर्माता कंपन्यांच्या बॅचेस रद्द केल्यामुळे हा तात्पुरता स्वरुपाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसाच्या आत या गोष्टी सुरळीत होतील. कारण त्या कंपनीच्या एमडींसोबतही आमची चर्चा झाली आहे, असंही टोपेंनी सांगितले.

तुटवडा झाला म्हणून काळाबाजार करुन पैसे कमवावे असं होऊ नये म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारला 2200 रुपये इतक्या स्वस्त दरात याची विक्री करण्याची आवश्यकता आहे, असं टोपेंनी सांगितले.

 

 

 

 

मागे

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?
बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आह....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होत....

Read more