By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभेसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. २०१४ मध्ये “डॅडी’ची कन्या गीता गवळी थोडक्यात पराभूत झाल्या. तुरुंगात असलेलेे डॅडी बाहेर आले तर प्रचाराचीही गरज पडणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतोय. १० ते १२ जागी उमेदवार उभे करण्याचा त्यांच्या अखिल भारतीय सेनेचा विचार आहे. सलग २ निवडणुकांत पराभूत झालेल्या अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतील मध्यवर्ती कार्यालयात गर्दी दिसते. भायखळा दगडी चाळ नवरात्र उत्सव मंडळाचे हे ४६ वे वर्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावरच सण आल्याने येथे नवरात्रीतून निवडणुकीच्या जागराची तयारी सुरू आहे.
२०१४ मध्ये एमआयएमचे वारीस पठाण अवघ्या १३८२ मतांनी निवडून आले. एमआयएम, भाजप, काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेनेत मत विभागणी झाली. गीता म्हणाल्या, पठाण यांनी थेट धर्माच्या नावावर मते मागितली. यामुळे आमचा मुस्लिम मतदार तुटला आणि पराभव झाला. हा डॅडीचा बांधलेला मतदार असल्याची खात्री आम्हाला होती. यंदा अशी चूक होणार नाही. भायखळ्याचा आमदार दगडी चाळीतून होणार.
शिवसेनेने मुंब्रा-कळवा मतदारसंघातून मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदव....
अधिक वाचा