By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज वयाच्या 66 वर्षी दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केल होत. त्यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपट्टूला देश मुकला आहे. गेल्या 6 ऑगस्टला माजी परराष्ट्रमंत्री व भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज्य यांचे निधन झाले आणि आता जेटलींच्या निधनाने भाजपलाच नव्हे तर संपूर्ण देशाला दूसरा धक्का बसला आहे.
अरुण जेटली हे प्रख्यात वकील होते. ते गेल्या 2 वर्षापासून आजारी होते. त्यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. त्या आधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी जेटली यांना श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर एक पथक उपचार करीत होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटली यांनी कायदा आणि जलवाहतुक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. सन 2000 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये राज्यसभेत विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री पदाबरोबरच अतिरिक्त मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. भाजप सरकार यावेळी पुन्हा सतेत आल्यानंतर जेटली यांनी तब्बेतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकारं दिला होता.
आपल्या देशात नेहमीच मंदी असल्याच चित्र रंगवल जात मात्र मंदी भारतातच नव्हे ....
अधिक वाचा