ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मैं शपथ लेता हू, अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2020 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मैं शपथ लेता हू, अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

शहर : asola

व्हीआयपी नेत्यांना आमंत्रण टाळतआम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सामान्य नागरिकांच्या साक्षीने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. रविवारी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या मुहूर्तावर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवालांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रामलीला मैदानावर केजरीवालांच्या साथीने सहा कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा  रंगला.

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, कैलाश गहलोत, गोपाल राय, इम्रान हुसैन यांचा शपथविधी झाला. राजधानी दिल्लीच्या जडणघडणीत हातभार लावणारे सामान्य रिक्षाचालक, सफाई कामगार, डॉक्टर, शिक्षक, बाईक अॅम्ब्युलन्स चालक, बस मार्शल, बांधकाम मजूर अशासुपर 50’चा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु वाराणसी दौऱ्यावर असलेल्या मोदींनी या सोहळ्याला हजेरी लावलेली नाही. कोणत्याही राज्यांचे मुख्यमंत्री किंवा दिग्गज राजकीय नेत्यांना शपथविधीला बोलावणार नसल्याचंआपकडून सांगण्यात आलं होतं.दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा छोटा मफलरमॅनही केजरीवालांच्या पाहुण्यांच्या यादीत होता. एक वर्षाच्या अव्यान तोमरलाही या सोहळ्याचं खास निमंत्रण होतं.

काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवालांनीही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतआपने 62 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसचा पुरता सुपडासाफ झाला आहे. दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. दिल्लीचे निकाल मंगळवार 11 फेब्रुवारीला जाहीर झाले.अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी 2014 रोजीव्हॅलेंटाईन डेला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ‘व्हॅलेंटाईन डेशी केजरीवालांचं अनोखं कनेक्शन असल्याने ते पुन्हा याच मुहूर्ताची निवड करतील, असं म्हटलं जात होतं. परंतु अरविंद केजरीवाल यांनी यंदा दोन दिवस उशिराचा दिवस ठरवला.

 

मागे

पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

                मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वा....

अधिक वाचा

पुढे  

आमदारांना ३० लाखांपर्यंतची गाडी, ५ वर्षांचे व्याज सरकार भरणार
आमदारांना ३० लाखांपर्यंतची गाडी, ५ वर्षांचे व्याज सरकार भरणार

राज्यातील आमदार आता स्वतःसाठी ३० लाख रुपयांपर्यंतची आलिशान गाडी घेऊ शकणार ....

Read more