ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सावंतांचं मंत्रालय पुन्हा मराठी मंत्र्याकडेच!

शहर : मुंबई

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सावंतांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सावंत यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा मराठी मंत्र्याकडेच देण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अरविंद सावंत यांचं अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभर असेल.

अरविंद सावंत यांचा राजीनामा

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा काल दिला. अरविंद सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे अशा शब्दात अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्तावाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.अरविंद सावंत यांनी काल सकाळी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केलं.

मागे

बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही - भाजप
बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही - भाजप

‘तुम्ही भले वचन दिले असेल, शरदराव आणि सोनियांनी थोडेच वचन दिलंय’ असं म्ह....

अधिक वाचा

पुढे  

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केल....

Read more