By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता उमेदवार उभा करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर. आणि संख्याबळावरही असं आशिष शेलारांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना सामना पाहायला मिळू शकतो. राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्ष दावा सोडायला तयार नसल्याने अखेर शिवसेनेने विरोधकांसोबत हात मिळवणी करुन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेने भाजपसोबतचं नातं तोडून आपला मुख्यमंत्री बसवण्याचा प्रयत्न करत आहे. अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. तर संसदेत भाजपने देखील त्यांना विरोधी बाकांवर जागा दिली आहे.
भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा मुंबई महापालिकेत दिला आहे. आता शिवसेना एनडीएमधून बाहेर पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेतील युती पुढे कायम राहणार की भाजप पाठिंबा काढून घेणार याकडे लक्ष लागलं आहे. या निम्मिताने आता नवी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा ११३ आहे. आता भाजपकडून स्वबाळाची तयारी सुरु झाल्याने शिवसेना आणि भाजप वेगवेगळेच लढण्याची शक्यता आहे.
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला किती जागा?
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - ०९
मनसे - ०७
समाजवादी पक्ष - ०६
एमआयएम - ०२
इतर - ०६
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानाने ....
अधिक वाचा