ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्रातही एकत्र असायला हवं, सभात्यागाचं शिवसेना-राष्ट्रवादीला विचारा- अशोक चव्हाण

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्रातही एकत्र असायला हवं, सभात्यागाचं शिवसेना-राष्ट्रवादीला विचारा- अशोक चव्हाण

शहर : मुंबई

केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं. या विधेयकाला शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला, तर राज्यसभेतून त्यांनी वॉकआऊट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाविरोधात लोकसभेत भाषण केलं, पण राज्यसभेत मतदानाच्यावेळी राष्ट्रवादीनेही शिवसेनेप्रमाणेच वॉकआऊट केलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यसभेतून वॉकआऊट केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित केले गेले.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या मुद्द्यावरुन सूचक विधान केलं आहे. 'शेतकरी गळचेपी होत आहे आणि मध्यस्तांचा फायदा होतोय, याला काँग्रेसचा विरोधच आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रातही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत,' असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'भाजपला मदत अशी आमची भूमिका नाही. हा प्रश्न पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला तिथे मोठ्या प्रमाणावर विरोध झाला, त्या भागात परिणाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. सत्तारूढ पक्षाला पाठिंबा दिला असं नाही. असं कोणतंही पाऊल पक्षाने टाकलं नाही. आम्ही निषेध व्यक्त केला. बहुमत सत्ताधारी पक्षाकडे होतं. वॉकआऊट हा मार्ग आहे,' असं जयंत पाटील म्हणाले.

 

मागे

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका फेटाळली!
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका फेटाळली!

मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता क....

अधिक वाचा

पुढे  

दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा
दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा

पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदे पास कराल पण....

Read more