By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे यांचे आज जोरदार शक्तीप्रदर्शन याठिकाणी पाहायला मिऴाले. वरळी विभागात सकाळपासूनच शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे, नेते दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई संपूर्ण मुंबईतून शिवसेना, भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी स्वत:च्या नावे असलेली संपत्ती जाहीर केली. ठाकरे घराण्याची संपत्ती कधीही समोर आली नव्हती पण आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून संपत्तीचा आकडा समोर आला. आदित्य ठाकरें यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार ११ कोटी ३८ लाखांवर त्यांची संपत्ती आहे. १० कोटी ३६ लाखाच्या बॅंक ठेवी, २० लाख ३९ हजारांचे बॉंड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५०हजार), ६४ लाख ६५ हजाराचे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम आहे.
मराठीबहुल वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा सुरक्षित मतदारसंघ आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांना पक्षात घेवून शिवसेनेने वरळीत विरोधकच शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे वरळी विधानसभा बिनविरोध करण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरु आहेत. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने शिवसेनेसाठीही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.
आदित्य ठाकरेंविषयी...
आदित्य ठाकरे हे २९ वर्षांचे असून सेंट झेवियर्स कॉलेजमधून इतिहास विषयातून पदवीधर, तर के सी लॉ कॉलेजमधून एलएलबी उत्तीर्ण आहेत. २०१० पासून युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी काम करण्यास सुरूवात केली. तर २०१२ ला दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार दिल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. २०१७ मध्ये मुंबई जिल्हा फूटबॉल असो. अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर २०१८ मध्ये वरळी इथं शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. कविता लिहण्याचा त्यांचा छंद अनेकांना माहीत आहे. २००७ मध्ये म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा 'माय थॉटस इन ब्लॅक अँड व्हाईट' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहलेल्या गाण्यांचा एक अल्बमही प्रसिद्ध आहे. आदित्य यांना खेळ आणि फोटोग्राफीतही विशेष रस आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर एकीकडे जाग....
अधिक वाचा