ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

शहर : मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे.

कामशेत बोगदापासून काही अंतरावर सोमवारी (21 ऑक्टोबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होती. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.

ही खासगी बस कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात झालाअपघातानंतर महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

मागे

मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर
मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर

राज्यभरात मतदानाची धावपळ आणि परळीतील राडेबाजीप्रकरण ताजं असताना, राष्ट्र....

अधिक वाचा

पुढे  

मी एकही शब्द चुकीचा बोललो नाही, चूक असेल तर फाशी घेईन जनतेने न्याय करावा - धनंजय मुंडे
मी एकही शब्द चुकीचा बोललो नाही, चूक असेल तर फाशी घेईन जनतेने न्याय करावा - धनंजय मुंडे

कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या क्लिपबाबत आज विधान परि....

Read more