ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 10:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रिमझिम पावसात विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान

शहर : मुंबई

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज देखील सज्ज झालं आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था देखील करण्यात आलं आहे. दुपारी वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात पावसाचं धूमशान असून आजही पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. पावसाचा परिणाम मतदानावर होणार का? अशी चिंता उमेदवारांना लागून राहिली आहे.

राज्यात एकूण कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

 

मागे

बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच, BJP उमेदवाराच खळबळजनक विधान
बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच, BJP उमेदवाराच खळबळजनक विधान

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतद....

अधिक वाचा

पुढे  

यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान
यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गज....

Read more