ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची संपत्ती ...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2019 11:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची संपत्ती ...

शहर : मुंबई

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर मुंबईच्या नालासोपारा भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांची संपत्ती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून समोर आलीय. प्रदीप शर्मा यांनी आपल्या आणि पत्नी स्वीकृती हिच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून दिलीय. काही वर्षांपूर्वी पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रदीप शर्मा यांनी आपली कौटुंबिक संपत्ती ३६.२१ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय. प्रदीप शर्मा राज्य पोलीस दलाचे १९८३ च्या बॅचचे अधिकारी होते

प्रदीप शर्मा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात आपली जंगम मालमत्ता (movable property) .८१ करोड रुपये आहे. तर पत्नीकडे १४.०२ करोड रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रदीप शर्मा यांनी अचल संपत्तीमध्ये काहीही घोषित केलेलं नाही.

स्वीकृती यांच्या नावावर .२१ करोड रुपयांची कृषी जमीन आणि १२ करोड मूल्य असलेली व्यावसायिक इमारत असल्याची माहिती दिलीय. अशा प्रकारे स्वीकृती यांच्या नावावर एकूण २०.३७ करोड रुपयांची स्थावर संपत्ती आहे.

मिळकतीची माहिती देताना २०१८-१९ मध्ये आपलं वार्षिक उत्पन्न .८३ कोटी रुपये तर पत्नीचं वार्षिक उत्पन्न ४१.६३ लाख रुपये असल्याचं प्रदीप शर्मा यांनी म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा यांच्याशिवाय माजी पोलीस उपायुक्त शमशेर खान पठान आणि गौतम गायकवाड हेदेखील आपलं भविष्य आजमावत आहेत. मुंबादेवी मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणाऱ्या पठान यांनी .१७ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केलीय. तर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना टक्कर देणाऱ्या गायकवाड यांनी आपल्याकडे .२१ कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलंय.

मागे

शिवसेनेला मोठा झटका; २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे
शिवसेनेला मोठा झटका; २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटक....

अधिक वाचा

पुढे  

'मातोश्री'च्या अंगणात बंडखोर तृप्ती सावंत यांचा धडाक्यात प्रचार
'मातोश्री'च्या अंगणात बंडखोर तृप्ती सावंत यांचा धडाक्यात प्रचार

शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री असलेला मुंबईतला वांद्रे पूर्....

Read more