ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले

शहर : मुंबई

शरद पवार साहेब कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असले तरी ते कुस्ती खेळू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही भाजपासोबत असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. शरद पवार तगडे पैलवान होते, पण सध्या पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवलेच खरे पैलवान आहेत, असं विधान त्यांनी खास आठवले शैलीत केलंय.दुसरीकडे शिवसेनेनं १० रुपयांमध्ये थाळी देण्याचं आश्वासन दिलंय... पण भाजपा रुपयांमध्ये तर आम्ही रुपयांत थाळी देण्याचा विचार करत होतो. मात्र, 'आता दोघांची थाळी खाऊन ठरवू... खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी' अशा शब्दांत शिवसेना-भाजपाला कोपरखळी मारलीय. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते. जेव्हा बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे निवडून आले तिथे ईव्हीएम मशीन नव्हत्या का? त्यामुळे ईव्हीएम मशिनवर शंका घेण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलंय. ईव्हीएम नाहीतर आम्हाला माणसांच्या मनाची साथ असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

 

 

 

मागे

कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कण....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई
निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आ....

Read more