By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९५वी जयंती. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी. नड्डा यांनी दिल्लीतील सदैव अटल स्मारकावर आदरांजली वाहिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासह भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी अटल स्मारकावर आदरांजली वाहिली. केंद्रीय मंत्री अश्वीनी चौबे आणि महेंद्र नाथ पांडेयसह पक्षातील दिग्गज नेत्यांनीही आंदरांजली वाहिली. लखऊनमध्ये वाजपेयींच्या नावाने बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा शिलान्यासही पंतप्रधान मोदी करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत रोहतांगमध्ये बनवण्यात आलेल्या बोगद्याला अटल बिहारी वाजपेयींचे नाव देण्यात आले.
अटलबिहारी वाजपेयी हे ५ वर्ष पंतप्रधान होते. जनसंघाचे मोठे काम वाजपेयींनी केले होते. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला.
नवी दिल्ली - कोणत्याही परिस्थितीत देशात नागरिकत्व सुधारणा काय....
अधिक वाचा