ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्कशीतील जोकर होऊ नये, भाजपचा घणाघात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्कशीतील जोकर होऊ नये, भाजपचा घणाघात

शहर : मुंबई

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसताना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप करणे हे हास्यास्पद आहे. निष्क्रिय कारभारामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतलाजोकर होण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी करू नये, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. महाराष्ट्रानं इतका राजकीय गृहमंत्री उभ्या इतिहासात पाहिला नाही,असंही भातखळकर म्हणाले आहेत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत राज्याची बदनामी करण्याचे काम भाजप देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा आरोप केला होता. अतुल भातखळकर यांनी देशमुखांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्र्यांनी त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमता वापरून वाटेल ती चौकशी करावी, भाजप कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सदैव तयार असून, केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चौकशीच्या धमक्या देण्याची सवयच अनिल देशमुख यांना असल्याची टीका भातखळकरांनी केली.

फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी विधानसभा सभागृहात सांगितले होते. त्या चौकशीचे काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे, असे आव्हान भातखळकरांनी दिले आहे.

ठाकरे सरकारने पोलिसांच्या बदनामीची काळजी करण्यापेक्षा पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचे काम बंद करावे. महाराष्ट्रानं इतका राजकीय गृहमंत्री उभ्या इतिहासात पाहिला नाही, अशा शब्दात भातखळकरांनी देशमुखांवर टीका केली. गृहमंत्र्यांनी कोरोना सेंटरमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर, पुणे शहरात सोमवारी झालेल्या गोळीबाराकडे लक्ष द्यावं. अन्यथा महिलांवरील अत्याचार, बलात्कार, दिवसाढवळ्या होणारे खून आणि गंभीर गुन्हे यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकांवर जाण्यास वेळ लागणार नाही. हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला अतुल भातखळकर यांनी दिला.

मागे

सुशांतप्रकरण भाजपकडून हायजॅक; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख
सुशांतप्रकरण भाजपकडून हायजॅक; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण भाजपने हायजॅक करून त्याला वेग....

अधिक वाचा

पुढे  

बिहारमध्ये एनडीएचंही ठरलं! जेडीयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार
बिहारमध्ये एनडीएचंही ठरलं! जेडीयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार

राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपाठोपाठ एनडीएनेही जागा वाट....

Read more