By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 05:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 19 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. 29 ऑगस्टला विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत संपत आहे. त्यांची जागा रिक्त होणार आहे. त्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 25 जुलैला अधिसूचना अधिसूचना जारी होईल.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुभाष झांबड विधान परिषदेत निवडून गेले होते. आता त्याच मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एक ऑगस्ट असून अर्जाची छाननी दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्टला होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत पाच ऑगस्ट आहे. निवडणुकीसाठी 19 ऑगस्टला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल॰ मतमोजणी 22 ऑगस्ट रोजी होईल॰ संबंधित मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता तात्काळ लागू होईल.
हार्मुज खाडीत अमेरिकन युद्धनौका युएसएस बॉक्सर जवळ 900 मिटर अंतरावर पोहोचल....
अधिक वाचा