ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2021 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

शहर : मुंबई

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. प्राथमिक अंदाजानुसार या निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान झालं आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (15 जानेवारी) दिली. राज्यातील एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे अंतिमतः 12,711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली.

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द झालीय. गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज आले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.

अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती, अशीही माहिती मदान यांनी दिली.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234

आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711

एकूण प्रभाग- 46,921

एकूण जागा- 1,25,709

प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221

अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024

वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197

मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719

बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718

अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

मागे

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका
धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका

गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने....

अधिक वाचा

पुढे  

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र
पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशहांनी पंतप्र....

Read more