ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 28, 2024 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान

शहर : पुणे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला. यानंतर सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खुले आव्हान दिले आहे.

मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांची औकात नाही, लायकी नाही औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या. त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, अशी आव्हान लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिले. मराठा आंदोलनामुळे एका रात्रीत काढलेल्या अध्यादेशावर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड टीका केली आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे. आम्हाला डावलल जात आहे. बेदखल केले जात आहे. हाच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मिंधे सरकारची किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्रीची ही औकात आहे का?

शिवाजी महाराजांचे नाव घेता

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का? छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात. राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही. मनोज जरांगे यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्यायचे असेल, तर चर्चेला या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत.

तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल. आता महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा एल्गार पुकारणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली असताना लक्ष्मण हाके समोर आले आहे.

 

मागे

हिंदी राष्ट्रभाषा नाहीच…राज ठाकरे यांचा भाषांसंदर्भात नेमका काय सल्ला
हिंदी राष्ट्रभाषा नाहीच…राज ठाकरे यांचा भाषांसंदर्भात नेमका काय सल्ला

महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी ऐकायला येते तेव्हा त्रास होतो. माझा कोणत्या....

अधिक वाचा

पुढे  

बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’, नितीशकुमार मंत्रिमंडळात दोघांना लॉटरी; काय आहे समीकरण?
बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’, नितीशकुमार मंत्रिमंडळात दोघांना लॉटरी; काय आहे समीकरण?

नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ....

Read more