By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर महाराष्ट्रात गटबाजीने विस्कळीत झालेल्या कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड होताच बाळासाहेब थोरात यांनी राज्यात पुन्हा एकदा आघाडीच सरकार येईल असा विश्वास माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत मी यशस्वी होईन. असेही थोरात यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच पक्षात गटबाजी उफाळून आली होती. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायच याची पक्षाला चिंता होती. पक्षाला नवसंजीवनी देने , पक्ष सोडून जाणार्या आमदारांना थोपवण, विधानसभा निवडणुकीची तयारी करण, मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाबबात चर्चा कारण अशी जबाबदारी नव्या प्रदेक्षाध्यक्ष थोराताना पार पाडावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीला 3 महीने शिल्लक असताना बाळासाहेब थोरात कशी जबाबदारी पार पाडणार हा प्रश्न आहेच. त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष पदी विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जानारे नगर जिल्हयातील बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करताना त्यांच्या जोडीला पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पूर्व विदर्भातून नितिन राऊत , पश्चिम विदर्भातून यशोमती ठाकुर , मराठवाड्यातून बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम तर कोकण , ठाणे मुंबईतून मुजफ्फर हुसेन यांचा समावेश आहे. आता कॉंग्रेस ची नवी टिम विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करणार याबाबत उत्सुकता आहे.
कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आणि त्यांच्या अपात्रतेसंबध....
अधिक वाचा