By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आघाडीला सोडली असून, ‘बविआ’ कडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘बविआ’ मधील घोळ हा अखे शेवटच्या दिवशी मिटला. पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे, 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मूदत होती. तर, बळीराम विकास आघाडीकडून तिघां जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी राज्यमंञी मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बॅकेचे संचालक राजेश पाटी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माञ अखेरच्या क्षणापर्यंत बविआकडून गुप्तता पाळण्यात आली होती. पालघरमधून शिवसेनेच्या तिकीटावर राजेंद्र गावित निवडणूक लढवणार आहे. तर, गेल्यावेळी पालघरमधील पोटनिवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर विजयी झालेल्या गावित यांनी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधलं.
मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आ....
अधिक वाचा