By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
निवडणुकीच्या मतदानाआधीच भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जोरदार धक्के बसत आहेत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर कारवाई केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा पीएम नरेंद्र मोदीच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यापाठोपाठ 24 तास प्रसारण होणार्या नमो टीव्हीवरही निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली आहे. नमो टीव्हीच्या प्रसारणावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात हा चॅनेल प्रसारित करता येणार नाही. पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेला निर्णय हा नमो टीव्ही या चॅनेलसाठी लागू आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
व्यासपीठावरून शाब्दीक फटकारे लगावत फोटो, व्हीडिओ, पुराव्या यांच्यासहित भा....
अधिक वाचा