By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 09:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : baramati
राज्यातल्या १४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आणि मराठवाड्यातले हे चौदा मतदारसंघ आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात मतदारसंघात मतदान होतंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, नगर आणि माढा तर कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी -सिंधुदुर्ग, मराठवाड्यातल्या जालना आणि औरंगाबाद आणि खान्देशातल्या रावेर आणि जळगाव या मतदारसंघात मतदान होतंय.
'बारामती कालही आमची होती... आजही आमची आहे... आणि उद्याही आमचीच राहील' असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान करणारे अजित पवार पहिले मतदार होते. हवा बदलत आहे. राज्यातील निम्या जागा आम्ही जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीतल्या रिमांड होम या मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. त्यांच्यासह आई प्रतिभा पवार, भाऊ रणजित पवार आणि शुभांगी पवार कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.
बारामती मतदार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील राहू या त्यांच्या गावी मतदानाचा हक्का बजावला. कांचन कुल या बारामतीत भाजपाच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे.
दुसरीकडे, जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भोकरदनच्या जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा सहकुटुंब हक्क बजावला.
औरंगाबादमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनीही मतदान केलं. त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलंय.
कोल्हापुरातदेखील उत्साहात मतदानाला सुरुवात झालीय. कोल्हापूर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक हेदेखील सहकुटुंब मतदान प्रक्रियेसाठी दाखल झाले. रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले.
माढा लोकसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटणच्या निंबोरे गावात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी, आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील देशातल्या ११७ लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू आहे. मतदान होत आहे. तिसऱ्य़ा टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतदान केंद्रात बंद होणार आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून लढत आहेत तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघात, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या गुलबर्गा मतदान केंद्रात मतदान होत आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. या टप्प्या....
अधिक वाचा