ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दादासाहेब मुंडेंना पंकजा मुंडेंच्या समर्थकांची बेदम मारहाण

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 28, 2019 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दादासाहेब मुंडेंना पंकजा मुंडेंच्या समर्थकांची बेदम मारहाण

शहर : बीड

बीड : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी  काँग्रेस पदाधिकाऱ्यावर हल्ला केलाय. भाजप उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे संतापलेल्या पंकजा मुडेंच्या समर्थकांनी काँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांना बेदम मारहाण केली. बीड जिल्हाधिकारी कार्यलयातच ही मारहाण करण्यात आली. दादासाहेब मुंडे हे पूर्वी भाजपाचे पदाधिकारी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते कॉंग्रेस पक्षात असून त्यांनी प्रीतम मुडेंच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. 

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये घुसून ज्याप्रकारे मारहाण केली त्यावरून यांची बीडमध्ये किती दहशत आहे हे कळू शकते असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.यांच्या विरोधात कोणी आक्षेप घ्यायचे नाहीत, यांनी दडपशाही करत राहायच आणि केवळ उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने हे इतक्या पातळीवर जातात. या सर्वांची नावे माहीत आहेत. या गुंडांवर आजच्या आज कारवाई करावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

 

मागे

नवा आग्रीपाड्याकडे लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांचे दुर्लक्ष
नवा आग्रीपाड्याकडे लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांचे दुर्लक्ष

सांताक्रुझ येथे नवा आग्रीपाडामध्ये लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवा....

अधिक वाचा

पुढे  

मोदींचे 'मिशन शक्ती' भाषण तपासण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
मोदींचे 'मिशन शक्ती' भाषण तपासण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष....

Read more