By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
बीड - बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. बीडमध्ये 58 पैकी 32 मतं महाविकासआघाडीला तर 21 मतं भाजपला मिळाली. तर यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीच्या शिवकन्या सिरसाठ या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षसाठी आज (4 जानेवारी) निवडणूक पार पडली. यात महाविकासआघाडीला 32 मतं मिळाली. तर भाजपला 21 मतं मिळाली. यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले. हायकोर्टाच्या आदेशामुळे हा निकाल 13 जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला होता. ‘लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं होतं. आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याची कबुली खुद्द भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, परळी विधानसभेपाठोपाठ बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. पंकजा मुंडे या सध्या परदेशात आहे. त्यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेंटेंनी आपल्या सदस्यांना व्हीप बजावला.
बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल –
राष्ट्रवादी काँग्रेस – १९
काँग्रेस – ३
भाजपा – १९
शिवसेना – ४
काकू – नाना आघाडी – २
अपक्ष – २
शिवसंग्राम – ४ ( मात्र सर्व सदस्य भाजपवासी झालेत)
औरंगाबाद - काल औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्र....
अधिक वाचा