By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 03:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
शेतकरी कागार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्हणून फब टेक उद्योगाचे प्रमुख भाऊसाहेब रूपकर यांच्या नावाची घोषणा शेकापचे जयंत पाटील यांनी केली. शेकापचा सांगोला विधानसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून गणपतराव देशमुखांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांच्या नावाची चर्चा असताना रूपकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गणपतराव देशमुख यांचे वय 94 वर्ष आहे. त्यामुळे यापुढे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. सांगोला या दुष्काळी मतदारसंघातून ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 1972 मध्ये काकासाहेब साळुंखे पाटील यांनी आणि 1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेस चे शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता. हे दोन अपवाद वगळता 1962 पासून ते या मतदार संघातून जिंकतच आले आहेत
संपूर्ण देशात तसेच राज्यात सर्वत्र पक्षात घराणे शाही बोकाळली असताना तब्बल 11 वेळा एकाच पक्ष एकाच मतदार संघातून निवडून आलेले शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मनात आणले असते तर सांगोला मतदार संघातून आपल पुत्र चंद्रकांत देशमुख यांना सहज उमेदवार म्हणून जाहीर करू शकले असते पण त्यांनी आपली राजकीय तत्वनिष्ठा सांभाळत निष्ठावंत कार्यकर्त्यास संधि देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शरद पवार यांच्या इडीच्या नाटयांनतर आणि अजित पवार यांच्या राजीनामा नंतर पुन....
अधिक वाचा